बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजितदादा, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर…”

मुंबई | अजित पवारांसोबत सरकार स्थापन केल्याचा पश्चाताप होत नाही. पण असं सरकार स्थापन करायला नको होतं. शंभर टक्के सांगतो. ती चूकच होती, अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यानंतर आता पहाटेच्या शपथविधीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यातच आता भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.

अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात त्यात काही नवीन नाही. मराठ्यांचा अपमान करू नका. मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय असती विचार करा, असं देखील निलेश राणे म्हणालेत.

मराठा आरक्षणावरून सध्या भाजप आणि महाविकास आघाडी आमने सामने आली आहे. कायदा आणि संविधान बघत नाहीत. ही लोकं काही काळ आमच्यासोबत होती. त्यामुळे या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, अशी टीका अजित पवारांनी नरेंद्र पाटलांवर केली होती.

दरम्यान, अजित पवार म्हणतात माझ्याकडे किती भाजपचे आमदार येतात ते पाहा. पवार साहेब, ते तुमच्याकडे नाही तर उपमुख्यमंत्र्यांकडे येतात. ज्या दिवशी उपमुख्यमंत्रिपद जाईल, त्या दिवशी आमदार सोडा नारळपाणी विकणारा पण येणार नाही तुमच्याकडे, अशा शब्दात निलेश राणेंनी अजित पवारांवर टीका केली होती.

थोडक्यात बातम्या-

“फडणवीसांनी चुक मान्य केली पण, एखाद्या पक्षाने ऑफर दिली तर ते पुन्हा सत्ता स्थापन करतील”

लठ्ठपणा असलेल्या लोकांना लाँग कोविडचा धोका अधिक; संशोधनातून नवी माहिती समोर

“लाॅकडाऊन अजून पुर्णपणे उठला नाही, कोरोना वाढल्यास जनता जबाबदार राहील”

लातूरमधील 36 वर्षीय तरूण उद्योजक संगमेश्वर बोमणे यांचं कोरोनाने निधन!

‘या’ चित्रपटासाठी आमिर खानने चक्क 12 दिवस केली नव्हती अंघोळ!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More