“महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे, कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही”
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतल्यापासून राज्यभर गदारोळ सुरु झाला आहे. अनेकांनी राज ठाकरे यांनी लक्ष करत आरोपांचा भडीमार केला आहे. एवढंच नाहीतर काहींनी राज ठाकरे आणि मनसे नेत्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अशी पत्रे शिवसेना भवनात आम्हाला रोज शेकड्याने येत असतात. महाराष्ट्रात कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही. महाराष्ट्र सुरक्षित आहे. जर कोणाच्या केसाला धक्का लागला तर केंद्र सरकार त्यांची सीआयएसएफची सुरक्षा द्यायला समर्थ आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
राज ठाकरे इतक्या वर्षांपासून महाराष्ट्रात राहतात. ते ठाकरे आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय नेत्याला हात लावण्याची कोणाचीही हिंमत नाही. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे. ही स्टंटबाजी सोडून द्यावी, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
दरम्यान, भोंग्याचा मुद्दा आक्रमक झाल्यापासून राज ठाकरेंना आणि मनसे नेत्यांना अनेक धमक्या येत आहेत. याप्रकरणी मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandagaokar) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Valse patil) यांची भेट घेतली.
थोडक्यात बातम्या –
‘…म्हणून माझं लग्न होत नाहीये’; कंगनानं स्पष्टच सांगितलं
…म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सोशल मीडियाला रामराम
भाजपला मोठा झटका?; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता
मंत्रालयासमोर कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न, ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर
Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर
Comments are closed.