नरेंद्र मोदींवर टीका करण्याची काही गरज नाही, कारण…- शरद पवार
पुणे | शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर अनेक मिसाईल हल्ले करण्यात आले. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा मोहिम राबवली जात आहे. त्यातच आता शरद पवारांनी यावर भाष्य केलं आहे.
चीन आणि भारताने कोणाचीही बाजू घेतली नाही. पंडित नेहरूंच्या काळापासून आपलं ते धोरण आहे. संघर्षात आपण कोणाची बाजू घेत नाही. त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी जी काही भूमिका घेतली आहे त्यावर टीकाटीपण्णी करण्याची गरज नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांना कसं बाहेर आणता येईल हे पाहिल पाहिजे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
पुतिन यांच्याशी केंद्र सरकारने चर्चा केल्यानंतर पॅसेज खुला असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु, मुलं अडचणीत आहेत. रशियाचा गोळीबार सुरू आहे. घराबाहेर पडता येत नाही, असं विद्यार्थी सांगत आहेत. याशिवाय युक्रेनचे नागरिक भारतीय मुलांवर नाराज आहेत. तुमच्या देशाने ठोस भूमिका घेतली नाही, असं ते सांगत आहेत, असं शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, केंद्र सरकाच्या कामाची पातळी घसरत आहे आणि ते कुठपर्यंत घसरत गेलेत याची अनेक उदाहरणं आहेत. त्याची कामगिरी महाराष्ट्रातही पहायला मिळत आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या येण्याला आक्षेप नाही. मात्र, अर्धवट कामांच उद्घाटन करण्यासाठी मोदी येत आहेत, अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“शिवसेना आम्हाला सोडून गेली त्यात संजय राऊतांचा पुढाकार होता”
“ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी माझी वाईट अवस्था झाली नाही”
“…मग राणेंना अटक झाली तेव्हा त्यांचा राजीनामा का घेतला नाही?”
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे भाव
मोठी बातमी! मायदेशी परतण्यासाठी नागरिकांना वाट मोकळी, रशियाने घेतला मोठा निर्णय
Comments are closed.