बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गरिबांना लुटणाऱ्यांना सरकार सोडणार नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी

गांधीनगर | गुजरातमध्ये केंद्रीय मुख्य दक्षता आयोगाच्या आणि केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संयुक्त परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमात आभासी प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचारावर परखड मतं व्यक्त केली आहेत.

देशाची फसवणूक करणाऱ्या लोकांसाठी देशात कुठलीही जागा सुरक्षित असू नये. कोणी कितीहा ताकदवान असो, जर ती व्यक्ती राष्ट्रहित आणि जनहित यांच्यामध्ये येत असेल तर त्यावर कारवाई करताना केंद्रीय यंत्रणांनी मागे राहता कामा नये. गरिबांना लुटणाऱ्यांना सरकार सोडणार नाही, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

या कार्यक्रमादरम्यान, नरेंद्र मोदींनी 2014 पूर्वीच्या सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. मागील सरकारच्या काळात भ्रष्टाचाराच्या विरूद्ध कारवाई करण्याची राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीची कमी होती. मात्र, आमच्या सरकारच्या काळात विविध पावलं उचलत भ्रष्टाचाराची दारं आम्ही बंद केली आहेत, असं मोदी म्हणाले आहेत.

दरम्यान, आमच्या सरकारच्या काळात डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करत विविध सुविधा आणल्या आहेत. लोकांच्या जीवनात आमच्या सरकारचा हस्तक्षेप कमी ठेवला आहे. म्हणूनच भ्रष्टाचाराला वाव राहिला नाही. तसेच केंद्रीय यंत्रणांचा वापर करत कोणाला घाबरावयचे काम नाही, असा सल्ला मोदींनी केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

थोडक्यात बातम्या –

सुट्टी नाहीच! ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन फेटाळला

“अजितदादांनी सांगितल्यामुळे शांत बसलो नाहीतर सोमय्यांचा तोतरेपणा काढला असता”

नरेंद्र मोंदीची का होतेय जेम्स बाँडसोबत तुलना?

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात घट; सर्वसामान्यांना दिलासा

“महाविकास आघाडीमध्ये राहायचं की नाही याचा लवकरच निर्णय घेऊ”

भ्रष्टाचार कितीही मोठा असला तरी केंद्र सरकार त्याची पाळेमुळे खणून काढणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More