बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कॅप्टन बदला हे संघाच्या बाहेर असलेल्या व्यक्तीने सांगून त्याचा काही फायदा होत नसतो”; फडणवीसांचा राऊतांना चिमटा

मुंबई | देशात विरोधी पक्ष मजबूत करायचा असेल तर यूपीएचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले पाहिजे. अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यूपीएचा कॅप्टन बदला हे सोळावा गडी म्हणतोय, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. या कार्यक्रमादरम्यान फडणवीसांनी संजय राऊतांना टोला लगावला व म्हणाले की, संघाचा कॅप्टन बदला हे संघाच्या बाहेर असलेल्या म्हणजेच सोळाव्या गडीने सांगून त्याचा काही फायदा होत नसतो, त्यासाठी टीममधे असावं लागतं.

देवेंद्र फडणवीसांनी गेल्या काही दिवसांपासून लेटरबॉम्ब प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यानंतर महाविकास आघाडी विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा वाद पेटताना दिसून आला. एकमेकांवर टीकेची झोड उठवायला सत्ताधारी तसेच विरोधकांनी कोणतीही कसर सोडली नाही.

सध्या यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आहेत, पण त्या राजकारणात तेवढ्या सक्रिय नसल्याने शरद पवार यांनी नेतृत्व केल्यास देशातील युपीएसोबत येऊ इच्छिणाऱ्या लोकांना बरोबर घेऊन सक्षम विरोधी पक्ष बनवता येऊ शकतो. अशी इच्छा राऊतांनी व्यक्त केली होती. पण त्यावर फडणवीसांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख सोळावा गडी असा केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्र पुन्हा लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर; ‘या’ जिल्ह्यातही आजपासुन कडक लाॅकडाऊनचे आदेश!

धक्कादायक! विद्यापीठाच्या आवारातच पाहत होते शिक्षक आणि कर्मचारी पॉर्न फिल्म

मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरणात अटक झालेल्या सचिन वाझेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

सचिन वाझेच्या घरात 62 जिवंत काडतुसं सापडली; NIA चा मोठा खुलासा

आव्हाडांनी रश्मी शुक्लांवर केलेल्या गंभीर आरोपांवर प्रविण दरेकर म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More