बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आम्ही चौकशी केली, त्यात कोणताही घोटाळा झालाच नाही’; देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले

मुंबई | सरकार बदललं की मागच्या सरकारने केलेल्या कामाचा तपशील नवं सरकार पाहत असतं. भारतीय लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात 2019 मध्ये सत्तांतर झालं. फडणवीस सरकारच्या कामाचं मोजमाप आता ठाकरे सरकारकडून काढलं जात आहे. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं ठाकरे सरकारचं म्हणणं आहे. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

जलयुक्त शिवार योजना म्हणजे सर्वात यशस्वी झालेली योजना आहे. राज्यातील शेतीसाठी पाण्याचं प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही जलयुक्त शिवार योजना राबवली होती. राज्यातील शेतीसाठी पाण्याची कमतरता भासू नये म्हणून हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला होता. या योजनेत कसलाही घोटाळा नाही, असं सांगतानाच फडणवीस यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या योजनेत कसलंही काळेबेरे नाही, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या महत्वाकांक्षी योजनेवर 9634 कोटी रूपये खर्च केले होते. कॅगच्या अहवालात फडणवीस यांच्या या योजनेवर ताशेरे ओढण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारने फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. आयआयटीने सुद्धा जलयुक्त शिवार योजनेनं पाणी पातळीत वाढ झाल्याचं म्हटलं आहे, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं आहे.

दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यात 4 लाख कामे झाली त्यातील फक्त 600 कामांमध्ये आम्ही चौकशी करण्याचे आदेश दिले होते. हे प्रमाण 1 टक्क्याहून सुद्धा कमी आहे. असं म्हणत जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फडणवीस यांनी फेटाळून लावले आहेत.

थोडक्यात बातम्या 

उदय सामंत म्हणजे कोकणातले शक्ती कपूर – नितेश राणे

“माझी लढाई एक प्रकारची क्रांती, आता शांत बसणार नाही”

धावबाद होताच फलंदाजाने रागाने फेकली बॅट अन्…; पाहा व्हिडीओ

“कन्यादान करायला मुलगी वस्तू आहे का?”; कन्यादान शब्दावर आलियाचा आक्षेप

दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More