बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तळीये गावात क्षणात होत्याचं नव्हतं झालं, सलग 40 मृतदेह रांगेत!

रायगड | तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. तसेच ढिगाऱ्याखाली 70 ते 80 जण दबल्याचा अंदाज आहे. ढिगाऱ्याखालून आत्तापर्यंत 40 मृतदेह काढण्यात आले आहेत. या घटनेनं संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं आहे. तब्बल 35 घरं ढिगाऱ्याखाली गाढली गेलीत.

तळीये गावात रेस्क्यू ऑपरेशन जोरात सुरु आहे. स्थानिक प्रशासनासोबत इतर ठिकाणच्या सुद्धा रेस्क्यू टीम दाखल होत आहेत. ठाणे शहरातील एक रेस्क्यू ऑपरेशन टीम तळीये गावात पोहोचली.

दरड कोसळल्याने संपूर्ण तळीये गाव जमीनदोस्त झालं आहे. यामध्ये आतापर्यंत 40 नागरिकांचा मृत्यू झालाय तर अजून 70 ते 80 नागरिक बेपत्ता असल्याची माहिती आहे. या घटनेनं संपूर्ण देश सुन्न झाला आहे. तळीये गावात घडलेल्या घटनेने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, केंद्र सरकारकडून या दुर्घटेनत मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना 2 लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजार रूपये देणार असल्याचं केंद्र सरकारने सांगितल आहे. राज्य सरकारकडून देखील मृृतांच्या वारसांना 5 लाख रूपयांची मदत देण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

राज कुंद्राला ‘या’ अभिनेत्रीचा सपोर्ट, म्हणाली…

शेअर मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांनो… ‘डीमॅट’च्या नियमात 1 ऑक्टोबरपासून मोठा बदल!

शिल्पा या प्रश्नांची उत्तरं दे… चौकशीत क्राईम ब्रांचनं विचारले हे 10 प्रश्न

#TokyoOlympics | पोरगं महाराष्ट्राचं नाव काढणार!; तिरंदाजीत दमदार कामगिरी

पुणेकरांनो सावधान… खडकवासला 100 टक्के भरलं, नदीचं पाणी वाढतंय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More