बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा! कोरोनामुळे होणाऱ्या ‘या’ आजारावर होणार मोफत उपचार

जालना | कोरोनाने राज्यात हैदोस घातला असताना इतर आजारांनी डोेकं वर काढलं आहे. यामध्ये म्युकरमायकोसिस नावाच्या एक बुरशीजन्य आजाराने नागरिकांमध्ये दहशत केली आहे. या आजारामध्ये नाकाजवळ, ओठांच्या आजुबाजुला काठे ठिपके दिसतात.

जर या आजारावर त्वरित उपचार झाले नाही तर नाक किंवा श्वसनयंत्रणे मार्फत बुरशी शरिरात प्रवेश करते आणि नंतर ती डोळे, मेंदू यावर प्रामुख्यानं हल्ला करतं असल्याची माहिती आहे. या आजाराबाबत राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

राज्यातील काही भागात कोरोना रुग्ण म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराबाबत जनजागृती मोहिम हाती घेण्यात येणार असून म्युकर मायकॉसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे मोफत उपचार करण्यात येणार असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं.

दरम्यान, नाकबंद होणं,  नाकातून काळा किंवा रक्तयुक्त द्रव येणं, गालाचं हाड दुखणे चेहऱ्याच्या एका बाजूने दुखणं, सूज येणं,
दात दुखणे, दात हलणे किंवा पडणे, जबडा दुखणे, अंधुक दिसणे, डोळे दुखणे, वेदना होणे, छाती दुखणे आणि श्वासोच्छवासाचा त्रास होणे अशा प्रकारची लक्षणे या आजाराची आहेत. जर काही जाणवलं तर त्त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत.

 

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, बरे होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली

‘कामे वेळेत आणि दर्जेदारपणे पू्र्ण करा, अन्यथा…’; अशोक चव्हाणांनी कंत्राटदारांना भरला दम

“उत्तर प्रदेशात होऊ शकतं मग महाराष्ट्रात का नाही, लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या”

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढणार?; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्यता

‘कामे वेळेत आणि दर्जेदारपणे पू्र्ण करा, अन्यथा…’; अशोक चव्हाणांनी कंत्राटदारांना भरला दम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More