बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाला यश, ठाकरे सरकारने मान्य केल्या ‘या’ मागण्या

मुंबई | गेल्या तीन दिवसांपासूून खासदार छत्रपती संभाजीराजे आझाद मैदान येथे आमरण उपोषणास बसले होते. राज्य सरकारने शब्द दिल्यानंतर देखील मागण्या मान्य न झाल्याने संभाजीराजेंनी उपोषणाचा पवित्रा घेतला होता. सोमवारी महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने संभाजीराजेंची भेट घेतली. मागण्या मान्य झाल्याने आता संभाजीराजेंनी उपोषण मागे घेतलं आहे.

शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी छत्रपती यांची भेट घेतली. मागण्या मान्य झाल्याचं लेखी उत्तर त्यांनी दिलं आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मान्य झालेल्या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या आहेत.

या मागण्यांनुसार सारथीच व्हिजन 30 जूनपर्यंत तयार करणार तसेच मराठा समाजातील युवकांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सारशी संस्थेमधील रिक्त पदे 15 मार्च 2022 पर्यंत भरणार आहेत. सारथीच्या आठ उपकेंद्रासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव 15 मार्चपर्यंत मंत्रिमंडळासमोर ठेवणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठा आंदोलनामध्ये आतापर्यंत 18 जणांना नोकरी देण्यात आली आहे. ज्यांचा गुन्ह्यांमध्ये सहभाग नव्हता त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात केस टू केस प्रकरण निहाय निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच कोपर्डी खुन खटल्याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अपिलाची सुनावणी तातडीने घेण्यासाठी न्यायालयात मेन्शन दाखल करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुर्नविचार याचिकेची सुनावणी खुल्या न्यायालयात घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पंधरा दिवसांमध्ये अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अण्णासाहेब पाटील महामंडळास अतिरिक्त 100 कोटींचा निधी देणार असल्याचं सांगण्यात आलंय. व्याज परताव्याची मुदत 10 लाखांवरून 15 लाखांपर्यंत वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी गुढीपाडव्याच्या दिवशी वसतीगृहांचं उद्घाटन, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे या संभाजीराजेंच्या मागण्यांसह अतिरिक्त मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“ह्रदयाचे ठोके वाढले आहेत, आशा आहे की..”; अमिताभ बच्चन यांचं ट्विट चर्चेत

राष्ट्रवादीला मोठा धक्का! ‘या’ नेत्याची 13 कोटी 41 लाखांची मालमत्ता जप्त

मोठी बातमी! तीन दिवसांनंतर छत्रपती संभाजीराजेंचं उपोषण मागे

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार की आणखी चिघळणार?, दोन्ही देशात चर्चेला सुरुवात

संभाजीराजेंना पाठींबा देण्यासाठी 12 वर्षीय मुलाने अडवला राऊतांचा ताफा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More