मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर राज्यात सुरु झालेले राजकीय महानाट्य गुरुवारी नवं सरकार स्थापन झाल्यावर संपलं. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर महाराष्ट्राच्या सर्व महत्वाच्या नेत्यांनी यावर भाष्य केलं. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेे आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
आषाढीच्या महापूजा कोण करणार यावर समाज माध्यमांवर अनेक चर्चा सुरु होत्या. मात्र आता विठ्ठलाची पूजा नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार हे स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपुर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विठ्ठलाची पूजा देवेंद्र फडणवीस करतील, असा दावा केला होता.
आता विठूरायाने एकनाथ शिंदेंना पूजेला बोलावलं आहे, आणि ते पूजा करणार आहेत. पण शासकीय पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच पूजा करणाऱ्यांचं सरकार रहाणार की नाही? हा प्रश्न आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत ते आमदार अपात्र ठरल्यास, सर्व काही समोर येणार आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले.
देवेेंद्र फडणवीस यांच्यावर पांडूरंग का नाराज आहे, हा संशोधनाचा विषय आहे. हे भाकित मी अगोदर सुद्धा केलं असल्याचं मिटकरी म्हणाले. हे सरकार नेमकं आहे कोणाचं, भाजपचं की शिवसेनेचं याचं उत्तर आता चंद्रकांंत पाटील यांनी द्यावं. भाजपचे आहे तर फडणवीस मुख्यमंत्री का नाहीत, नसेल तर शिवसेनेचं आहे हे स्वीकारा, असंही मिटकरी म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
‘उपमुख्यमंत्री होण्याची फडणवीसांची इच्छा नव्हतीच पण…’; भाजप नेत्याचा मोठा खुलासा
‘भविष्यात असे प्रकार…’; टेबलवर चढून नाचणाऱ्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
“…म्हणून महाराष्ट्र, सूरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करावा लागला”
उपमुख्यमंत्री होताच फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, ओबीसी आरक्षणासाठी उचललं महत्त्वाचं पाऊल
आपत्तीच्या काळात संपर्क ठेवा, मी सर्वांसाठी 24 तास उपलब्ध- एकनाथ शिंदे
Comments are closed.