बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

10वी आणि 12 वीच्या परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

मुंबई | दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. तर 12 वीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे यादरम्यान होणार आहे. या परीक्षेला विद्यार्थी बसू शकला नाही तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. अशा विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येणार आहे.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे 10वी आणि 12 वीचे जे विद्यार्थी वेळापत्रकानूसार परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्याच्या घरात किंवा परिसरात कोरोना रुग्ण असतील, तसच तो राहत असलेला विभाग सील केला असेल, अशा विद्यार्थ्यांना आता परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे त्यांची जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा ही ठरलेल्या तारखेनुसारच होणार आहे. पण प्रात्यक्षिक परीक्षेत काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. कोरोना परिस्थितीमुळे दहावी-बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यी शिकत असलेल्या शाळा आणि महाविद्यालयातच होणार आहे, अशी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

दरम्यान, 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्याक्षिक परीक्षाऐवजी कोरोनामुळे असाईनमेंट द्याव्या लागतील. असाईनमेंट सादर करण्यासाठी 21 मे 10 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर 12 वी साठी प्रात्याक्षिक परीक्षा 22 मे ते 10 जून दरम्यान होईल. 12 वी विज्ञान शाखेच्या प्रात्याक्षिकांची संख्यादेखील कमी करण्यात आली आहे. कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर 15 दिवसांमध्ये असाईनमेंट सादर करावी लागणार आहेत. असाईनमेंट किंवा प्रात्यक्षिक परीक्षा देताना विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबात कुणाला कोरोना झाल्यास त्यांना 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल.

थोडक्यात बातम्या

फक्त पाच वर्ष थांबा, देशातील रस्ते अमेरिका-युरोपसारखे होतील- नितीन गडकरी

ऐकावे ते नवलच! ना भारतात, ना परदेशात, बापाने केली बाळासाठी चक्क चंद्रावर जमिनीची खरेदी

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी ‘इतके’ वर्ष लागणार- बिल गेट्स

ड्रीम्स मॉलमधील कोविड सेंटरच्या आगीला मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिका जबाबदार- देवेंद्र फडणवीस

मी लस घेतली पण फोटो काढून नौटंकी करायला मला आवडत नाही- अजित पवार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More