दिलासादायक ! एसटी कर्मचाऱ्यांसाठी ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून एसटी (S.T) महामंडळाचं विलीणीकरण राज्य सरकारमध्ये (State Govarnment) व्हावं, यासाठी एसटी कर्मचारी (S.T. Worker) आक्रमक झाले होते. एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचार्यांचे शासनात विलीणीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपही पुकारला होता. अशातच आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
एसटी महामंडळाने संपातील कर्मचार्यांना कामावर हजर होण्यासाठी आतापर्यंत सात वेळा संधी दिली. मात्र, या काळात 30 टक्केही कर्मचारी हजर होऊ शकले नाहीत. मात्र आता दिलासादायक माहिती समोर आली आहे.
एसटी महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी एका दिवसांत एसटी महामंडळातील 15 हजार 185 कर्मचारी हजर असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत 82 हजार 108 कर्मचाऱ्यांपैकी 61 हजार 647 कर्मचारी कामावर हजर आहेत. एसटी महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवसांत एसटी पूर्ण क्षमतेने सुरू होईल असा एसटी प्रशासनाला विश्वास आहे.
दरम्यान, नव्याने हजर होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना एक दिवसाचे जुजबी प्रशिक्षण देण्यात येणारं, असं परिवहन मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
थोडक्यात बातम्या –
11 लाखांच्या पैठणीवरून ट्रोल करणाऱ्यांना आदेश भाऊजींनी फटकारलं, म्हणाले..
“चार दिवस काय चार वर्षे उद्धव ठाकरेंनी माझी चौकशी करावी, कारण…”
“मुंबईत तुमची ताकद नाही, त्यामुळं तुम्ही कोणलातरी पकडून…”; संजय राऊतांचा हल्लाबोल
संजय राऊतांनी भाजपवर केलेल्या गंभीर आरोपाने राज्यात खळबळ
जो बायडन युक्रेनला जाणार?, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर
Comments are closed.