बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किंग कोहलीने मोडला महेंद्रसिंह धोनीचा हा खास विक्रम; बड्या खेळाडूंना मागे टाकत मिळवलं अग्रगण्य स्थान

मुंबई | जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा पहिला दिवस पाण्याने वाया गेला आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्युझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना चालू होण्यापुर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने मोठा पराक्रम आपल्या नावे केला आहे.

विराट कोहलीचा कर्णधार म्हणून हा 61 वा सामना आहे आणि आशियाई कर्णधार म्हणून हा विक्रम आहे. कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा 60 सामन्यांचा विक्रम मोडला आहे. विराट सर्वाधिक सामन्यात भारतीय कर्णधारांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. दुसऱ्या स्थानी महेंद्रसिंह धोनी तर तिसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि चौथ्या स्थानी सुनिल गावसकर आणि मोहम्मद अझरुद्दीन आहेत.

विराटसोबतच रोहित शर्मानेच्या नावावर मोठा विक्रम झाला आहे. रोहित शर्मा आयसीसीच्या दोन प्रमुख स्पर्धांच्या पहिल्या वहिल्या पर्वाच्या अंतिम फेरीत खेळणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. 2007 मध्ये तो टी-20 विश्वचषकाची अंतिम स्पर्धा खेळला होता. आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल तो खेळत आहे.

दरम्यान,  भारतीय संघाची सुरूवात दमदार झाली होती. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली फटकेबाजी करत होते मात्र जेमीसनने रोहितला स्लीपमध्ये झेल द्यायला भाग पाडलं आणि भारताला पहिला झटका बसला. त्यानंतर लवकरच वॅगनेरने आपल्या पहिल्याच षटकात शुभमनला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. सध्या विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

कौतुकास्पद! वृद्ध महिलेच्या गळणाऱ्या झोपडीसाठी सरसावले पोलिस

गंगा नदीने पुन्हा धारण केलं रौद्र रुप, भगवान शंकराच्या मुर्तीला स्पर्श करतंय पाणी

बेघर लाभार्थ्यांना जागा ताब्यात मिळवुन देण्यासाठी जमिनीत अर्ध दफन होऊन अनोखं आंदोलन

“सोनिया सेनेचे अध्यक्ष नाव महाराजांचं घेतात, काम मात्र औरंगजेबाचं करतात”

‘येत्या निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करणार का?’; अजित पवार म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More