बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! भारतातील ‘ही’ लस कोरोनावर प्रभावी; ICMR च्या संशोधनातून समोर आले निष्कर्ष

नवी दिल्ली | देशभरासह संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यातच सुरुवातीला कोरोनासाठी कोणत्याही प्रकारचं ठोस औषध नव्हतं. मात्र त्यानंतर आता भारतामध्ये दोन लसींचं उत्पादन होत आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड ही लस. भारतात सध्या लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच सरकारतर्फे नागरिकांना मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं जात आहे.

कोरोनावर प्रभावी नेमकी कोणती लस आहे? यासंदर्भात, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अँड व्हायरोलॉजी यांनी केलेल्या संशोधनात भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस कोरोनाच्या विविध स्ट्रेनवर प्रभावी ठरू शकते, असं स्पष्ट झालं आहे. कोरोना संसर्गाच्या भारतीय, ब्राझील आणि ब्रिटिश स्ट्रेनवर भारतात निर्माण झालेली ही लस प्रभावी असल्याचं संशोधनात आढळून आलं आहे.

आईसीएमआरने संशोधन करून कोरोनाच्या ब्रिटिश व्हेरीएंट आणि भारतीय व्हेरीएंटवर भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस प्रभावी असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता कोरोनावर मात करण्यासाठी भारतात बनणारी ही लस प्रभावी असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांनी आता कोरोनापासुन बचाव करण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घेणं गरजेचं आहे.

केंद्र सरकारतर्फे तसेच राज्य सरकारतर्फे कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू असून महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक लसीकरण पार पडलं आहे. 1 मे पासून 18 वर्षांच्यावरील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. तसेच येणाऱ्या काळात लसींचा साठा वाढवणार असल्याचंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या –

नाशिकमध्ये छातीत दुखून अचानक होणाऱ्या मृत्यूंबाबत संभ्रम कायम 2 दिवसांत चक्क 5 जणांचा मृत्यू 

“मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाही, सगळंच रामभरोसे”

धक्कादायक! कोरोनाबाधित वृद्ध जोडप्याची ‘या’ कारणामूळे रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट, जाणुन घ्या दिलासादायक आकडेवारी

विवाहीत प्रेयसीला भेटायला जाणं पडलं महागात, गावकऱ्यांनी दोघांना विजेच्या खांबाला बांधलं अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More