जालना | जे आमच्यासोबत येतील त्यांच्यासह नाही तर त्यांच्याशिवाय, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. शिवसेना हाच मोठा भाऊ आहे, असा वार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.
जालन्यामध्ये सुरु असलेल्या कार्यकारिणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. हिंदु्त्वाच्या मुद्द्यावरदेखील त्यांनी यावेळी भाष्य केलं.
भाजप हा लाचार पक्ष नाही युतीसाठी याचना करणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं. मुख्यमंत्र्यानी फक्त शिवसेनेवरच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही टीका केली.
दरम्यान, आगामी निवडणूक तोंडावर आली असून अद्यापही भाजप आणि शिवसेना यांच्यात युतीची चर्चा झालेली नाही.
महत्वाच्या बातम्या-
-गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
-नितीन गडकरी यांनी ते वक्तव्य मोदींना उद्देशूनच केलं- काँग्रेस
-उपाशीपोटी पुण्याच्या रस्त्यावर बसलेल्या शेतकऱ्यांना जेवण आणा!
-…म्हणून भर थंडीतही शेतकरी पुण्याच्या रस्त्यावर मुक्काम ठोकणार
-जालन्यात भाजप नेत्याची शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण
Comments are closed.