बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसच्या युवा नेत्याच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी, पाहाल तर हैराण व्हाल

सोलापूर | सोलापूरमधील मोची समाजाचे युवा नेते करण म्हेत्रे यांचं शनिवारी दुपारी निधन झालं. त्यानंतर रविवारी म्हेत्रेंच्या अंत्यसंस्कारासाठी शेकडोंच्या संख्येने नागरिक जमले होते. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

रविवारी सोलापुरात म्हेत्रेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याआधी, अंत्ययात्रेला शेकडो समर्थकांची गर्दी जमल्याने सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस स्थानक हद्दीत हा प्रकार घडला. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस कमी पडल्याचं दिसत होतं.

करण म्हेत्रे यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. म्हेत्रेंच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे कार्यकर्ते संबंधित हॉस्पिटलच्या परिसरात जमा झाले.

करण म्हेत्रे हे लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते होते. सोलापुरातील काँग्रेसच्या माजी नगरसेविका अनिता म्हेत्रे यांचे पती होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात होते. करण म्हेत्रे यांनी समाजात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी करण म्हेत्रे यांचं निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

रिक्षातून कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न, चालकासोबत घडला खतरनाक प्रकार, पाहा व्हिडीओ

कोरोनाचे नियम धाब्यावर; पुण्यात सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला मोठी बाईक रॅली

दिलासादायक बातमी! पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

मन सुन्न करणारी घटना; बापाने मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन पायी चालत स्मशानात नेला, पाहा व्हिडीओ

गोपीनाथ मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला- पंकजा मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More