पुणे | पुण्यात आज कोरोनामुळे 39 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात सर्वाधिक कोरोनाचे 1751 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
609 क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात 94 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले 883 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 42466 झाली आहे. पुण्यातील आताची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 16269 एवढी आहे. तर आतापर्यंत 1068 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.
दरम्यान, आज दिवसभरात राज्यात तब्बल 10 हजार 576 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, 280 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, 5 हजार 552 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
रिक्षात बसलेला तरुण पोलिसांना वाटला संशयास्पद; झडती घेतल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार!
भारतीय क्रिकेट संघाला 2 आठवडे ऑस्ट्रेलियामध्ये ठेवणार विलगीकरणात
पत्नीला घेऊन पतीची धावाधाव, 12 तासात चार रुग्णालयांनी नाकारलं; अखेर सायन रुग्णालयात महिलेचा मृत्यू
‘…त्यांना इतिहास कधीही माफ करणार नाही; अशोेक गेहलोत यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांना दिल्या खास शुभेच्छा; म्हणाल्या…
Comments are closed.