बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची ताजी आकडेवारी

मुंबई | संपूर्ण राज्यभरात कोरोना (Corona) महामारीने थैमान घातलं होतं. त्यातच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनेही महाराष्ट्रभर हाहाकार माजवला होता. परंतु ही रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, आता Omicronचा धोका देखील वाढताना दिसत आहे.

आज दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात 807 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Patient) नोंद झाली असून 869 कोरोना रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तसेच दिवसभरात 20 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 6 हजार 452 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण (Active Corona Patient) उपचार घेत आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 66 लाख 43 हजार 179 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 64 लाख 91 हजार 805 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त (Corona Free) होऊन घरी परतले आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 41 हजार 243 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू (Corona Death) झाल्याची आकडेवारी स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण राज्यात 6 कोटी 67 लाख 59  हजार 668  जणांची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या 

“पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांचं ऐकतात हीच त्यांची खरी ताकद”

“दलालांनो… मंगळसूत्र, शेती गहाण ठेवून दिलेले पैसे घेऊन तुमची मुलं सुखी होणार नाही”

Omicron | ‘….तर पुन्हा कडक निर्बंध लागू करू’; ‘या’ दहा राज्यांना केंद्राचा इशारा

“आघाडी केली म्हणजे आघाडीत आलंच पाहिजे असं काही नाही, कुणालाही कसलं बंधन नाही”

“पुढच्या आठवड्यात एका भाजप नेत्याला अटक होणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More