सावधान! लहान मुलांवर घोंगावतंय टोमॅटो फ्लूचं सावट, ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नका करू
नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे (Corona) पुन्हा एकदा सर्वांची चिंता वाढली असताना आता देशावर नवं संकट घोंगावत आहे.
देशात टोमॅटो फ्लूच्या (Tomato Flu) प्रकरणात वाढ होत असल्याने लहान मुलांवरील धोका वाढला आहे. 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना टोमॅटो फ्लूचा धोका सर्वात जास्त आहे. केरळ आणि कोल्लम येथेच ही प्रकरणं आढळून आली असली तरी याची आकडेवारी 80 च्या पुढे गेली आहे.
या आजाराची लागण झालेल्या मुलांना थकवा, ताप, अंगदुखी, सांधेदुखी जाणवते. त्याचबरोबर त्वचेवर पुरळ उठून जळजळ देखील होते. टोमॅटो फ्लू संक्रमित मुलांमध्ये ओटीपोटात पेटके तयार होणे, मळमळ, उलट्या, अतिसार, ही लक्षणं देखील आढळून येतात. तसेच हात, गुडघे, नितंब यांचा रंग खराब होणं, या लक्षणांचा देखील समावेश आहे.
दरम्यान, हा आजार नेमका का पसरतो याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही त्यामुळे वेळीच उपाययोजना नाही केल्या तर याचा प्रसार पसरू शकतो, असा इशारा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. टोमॅटो फ्लू मुळे लहान मुलांना शरीराच्या अनेक भागावर लाल फोडं येतात. त्यामुळे तुमच्या लहान मुलांमध्ये ही लक्षणं आढळून आली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
थोडक्यात बातम्या-
…अन् सेहवागने बीसीसीआयला फटकारलं; वाचा काय आहे नेमकं प्रकरण
किरीट सोमय्यांच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
“…केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये”
“उद्धव ठाकरेंच्या सभेला मैदान कमी पडेल, एवढी गर्दी होईल”
राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला म्हणणाऱ्या पटोलेंना अजित पवारांचं खोचक प्रत्युत्तर, म्हणाले…
Comments are closed.