बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्या आणि परवा राज्यात मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून खबरदारीचा इशारा

मुंबई | बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं गुलाब चक्रीवादळाचा धोका वाढताना दिसत आहे. उत्तर आंध्रप्रदेश आणि दक्षिण उडिसाच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ येत्या 26 तारखेला धडकणार आहे. त्यामुळे आता त्याचा फटका महाराष्ट्रात बसताना दिसत आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे उद्यापासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या अनेक भागात विजेच्या कडकटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढणार आहे.

विदर्भ आणि कोकणात 27 सप्टेंबरला जोरदार पाऊस पडेल. तर 28 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आता नागरिकांनी काळजी घेण्याच्या सूचना हवामान खात्याने दिल्या आहेत.

दरम्यान, सोलापूर, बीड, हिंगोली आणि इतरही भागात पावसाने थैमान घातलं आहे. अनेक नद्यांना पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी जनरल डायरसारखा प्रचार करत पार्थ पवारला पराभूत केलं”

“शिवसेना रेसचा घोडा, घोडे लावण्यात आम्ही एक्स्पर्ट”

“आमचं ठरलंय! महाविकास आघाडी सरकारची रिक्षा पंक्चर करायची”

” मी माफी मागणार नाही, ऑडिओ क्लिपमधील तो आवाज माझा नाहीच”

“शिवसेनेने आम्हाला धोका दिला, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा DNA वेगळाच”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More