बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! ट्विटरने चक्क महेंद्रसिंह धोनीची हटवलेली ‘ब्लू टीक’ पुन्हा दिली

मुंबई | भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला देशभरात सर्वजण ओळखतात. धोनीचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात आहे. धोनीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज या संघाचं नेतृत्त्व करतो. त्यामुळे धोनीने आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची चर्चा असलेली पाहायला मिळते. मात्र अशातच चर्चेत असणाऱ्या धोनीला ट्विटरने धक्का दिला होता. मात्र काही वेळानंतर पुन्हा त्यांनी ब्लू टीक दिली आहे.

ट्विटरने धोनीची ब्लू टीक हटवली आहे. धोनीची ब्लू टीक काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण धोनीला ट्विटरवर जवळपास 80 लाखांच्यावर फॉलोवर्स आहेत. त्यामुळे ट्विटरने नेमकी कोणत्या कारणामुळे धोनीची ब्लू टीक हटवली याचं कारण गुलदस्त्यात आहे.

धोनीची काढलेली ब्लू टीक पुन्हा ट्विटरने दिला आहे. काहा वेळातच ट्विटरने यु-टर्न घेत हटवलेली ब्लू टीक पुन्हा दिली आहे.

दरम्यान, ब्ल्यू टिक असलेलं अकाऊंट हे वेरिफाईड आणि ऑथेनटिक समजलं जातं. ट्विटरकडून नामवंत व्यक्तींच्या अकाऊंटला ब्ल्यू बॅज दिला जातो. गेल्या काही दिवसांपूर्वी ट्विटरनं भारतातील मोठ्या नेत्यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली होती. धोनी ट्विटरवर सुरूवातीला ट्विटरवर सक्रीय असलेला पाहायला मिळायचा. मात्र 2018 नंतर त्याने ट्विट करणं कमी केलं. मागील वर्षी धोनीने सोशल माध्यामांवरून आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती.

थोडक्यात बातम्या-

मेजर ध्यानचंद महान खेळाडू, हॉकीचे जादूगार होते पण…- संजय राऊत

“मोदींचं क्रीडा क्षेत्रातील योगदान काय?, अहमदाबादच्या क्रिकेट स्टेडियमलाही खेळाडूंचंच नाव द्या”

“खेळाडूंच्या सन्मानामध्ये राजकीय डावपेच का? अहमदाबाद स्टेडिअमला दिलेलं मोदींचं नाव हटवा”

‘हिंदू खतरे में है’; भाजप आमदाराचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More