महाराष्ट्र सोलापूर

“मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे, त्यामुळे मला काही अडचण येत नाही”

सोलापूर | ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद शमताना दिसत नाही. या ना त्या मुद्द्यांवरून सरकार विरूद्ध राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून येत आहे. काल राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी दिली नसल्याचं समोर आलं.

सरकारने राज्यपालांच्या विमान प्रवासाला परवानगी न दिल्यानं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं. आता यावर शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे.

आठ दिवसांपूर्वीच मी राज्यपालांना भेटलो. आपण वर्षभराचा आलेख जर बघितला तर माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे. त्यामुळे मला काहीही अडचण येत नाही. माझा राज्यपालांशी कायम संपर्क असतो, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. राजकीय ज्या काही गोष्टी आहेत त्या वेगळ्या आहेत. मात्र हे खातं चालवत असताना राज्यपालांशी संपर्क येतो, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

सावधान ! ‘या’ सवयी असतील तर तुम्हीही लवकरच म्हातारे व्हाल, वाचा सविस्तर

बापरे… रिषभ पंतच्या फलंदाजीला घाबरुन हा खेळाडू सोडणार होता क्रिकेट!

BBCला सर्वात मोठा धक्का; ‘या’ देशाने प्रसारणावर आणली बंदी

हेक्टरनंतर आता नव्या गाडीचा जलवा; एमजी लाँच करतंय ‘ही’ जबरदस्त कार!

“पवारांसारख्या भ्रष्ट राजकारण्याच्या हस्ते अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण नको”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या