पुणे महाराष्ट्र

उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे समोरासमोर येतात तेव्हा…

सातारा | भाजप नेते उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे हे एका लग्न समारंभात एकमेकांसमोर आले. त्यावेळी दोघेही भावूक झाले. आणि दोघांनीही एकमेकांची गळ भेट घेतली. याप्रसंगी उपस्थितीतांच्या भुवया उंचावल्या.

उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे  हे जुने मित्र आहेत. उदयनराजे राष्ट्रवादीत असताना या दोघांच्या मैत्रीविषयी बरीच चर्चा असायची. या लग्नसमारंभाच्या निमित्ताने त्यांच्या मैत्रीचा हळूवार कोपरा उलगडला.

उदयनराजे भाजपच्या वाटेवर असताना त्यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादीचे बरेच नेते प्रयत्न करत होते. त्यात शशिकांत शिंदे आघाडीवर होते. शिंदेंनी उदयनराजेंची समजूत काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मात्र त्या प्रयत्नांना यश आलं नाही. अखेर उदयनराजेंनी भाजपची वाट धरली.

दरम्यान, उदयनराजे भाजपत गेल्याने शिंदे आणि उदयनराजे हे एकमेकांचे राजकीय विरोधक झाले. मात्र आजच्या या प्रसंगाने त्या दोघांच्या मैत्रीचा प्रत्यय आला. राजकीय विरोध जरी टोकाचा असला तरी त्याच्या मनात त्यांच्या मैत्रीसाठी आजही वेगळं स्थान असल्याचं या निमित्ताने अधोरेखित झालं. 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या