कोण कोणाला आडवं करतंय ते येणाऱ्या निवडणुकीतच बघू- उदयनराजे

मुंबई | कुणाला वाटत असेल माझ्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल, त्याने आकडे दाखवावेत मी त्याच्या प्रचाराचे काम करीन, असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. 

अनेक जण बोलतात कोणीही चालेल पण उदयनराजे नको, मला पार आडवं करायचं चालू आहे. पण कोण कोणाला आडवं करतंय हे येणाऱ्या निवडणुकीतच बघू, असा सुचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

मंगळवारी उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची भेट घेतली. त्यावर मतदार संघातील विविध कामानिमित्त भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं. 

तसंच जसे पवार साहेबांचे इतर पक्षात मित्र आहेत, तसे माझे ही इतर पक्षात मित्र आहेत, असंही त्यांनी यावेळी नमुद केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

-धनंजय… लोकसभेचा विचार करताय की काय?; सुप्रिया सुळेंचा सवाल

-संस्कारी बाबूजी म्हणतात, लैंगिक शोषण झालं पण तो मी नाही!

-एक विवाह ऐसा भी!!! 65 वर्षीय सासऱ्याने केलं 21 वर्षीय सुनेशी लग्न

-लातूरमध्ये गतीमंद मुलीवर बलात्कार; उत्तर प्रदेशाच्या इसमाला अटक

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या