मुंबई | एक चांगलं झालं तुम्ही आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या आधीच तुम्ही हे पुस्तक लिहिलं आहे. पुढील पाच-दहा वर्ष असंच आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तक लिहित राहा. आम्हालाही नेमक्या उणीवा काय राहिल्या आहेत हे कळेल, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फडणवीस यांनी टोला लगावला.
माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईमध्ये पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून फडणवीसांना कोपरखळ्या दिल्या.
आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी जो विषय आपल्याला कळत नाही त्यावर तारे तोडू नयेत, असं म्हणत ठाकरेंनी जास्त बोलणं टाळलं. मराठीत कदाचित पहिल्यांदा पुस्तक लिहिलं गेलं असेल असं सांगताना हे पुस्तक सर्वात आधी मीच वाचणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
नोटबंदी हा विषय अर्थसंकल्पात यायला हवा होता का नाही? मला माहिती नाही, असं म्हणत ‘तुम्ही पुस्तक लिहाल आणि मी त्या उपस्थित राहिन, असा प्रसंग कधी येईल हे मला वाटलं नव्हतं. आपला कार्यक्रम कसा दुसऱ्यांच्या खर्चाने करावा, हे तुमच्याकडून शिकावं, असा टोमणा देखील उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना मारला.
ट्रेंडिंग बातम्या-
काय साहेब?, लोक मुर्ख वाटले का?; विशाल दादलानीने भाजपला फटकारलं
“गळ्याची आण खरं सांगतो; …तर मुनगंटीवारांना सगळ्यात जास्त आनंद होईल”
महत्वाच्या बातम्या-
सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या ‘या’ कार्यकर्त्याला राष्ट्रवादी देणार मोठी संधी?
15 ते 20 आमदार संपर्कात; भाजप नेत्याचा धक्कादायक दावा
कोरोना व्हायरस जगाला ‘या’ चार गोष्टी शिकवणार- आनंद महिंद्रा
Comments are closed.