मुंबई | मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी आज रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्धाटन केले. या उद्धाटनावेळी ते बोलत होते.
सध्या महाराष्ट्र रस्ते अपघातात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मला अपघाताची आकडेवारी कमी नाही करायची, तर मला या यादीत महाराष्ट्राचे नाव नकोच आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
जर तुम्ही वाहन चालवताना नियम आणि संयम नाही पाळला तर यम भेटीला येतो जो आपला जीव घेऊन जातो. त्यामुळे यमाला टाळायचे असेल तर नियम आणि संयम या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
वाहतूक नियम, शिस्त यांचे पालन करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे. मुलं सज्ञान झाली तर पालक ही सज्ञान होतील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
पाटोद्यात पेरे पाटील हरले, हिवऱ्यात पोपटराव जिंकले; अण्णांच्या राळेगणमध्ये काय झालं?
कोरोनामुळं बायकोचं चुंबनही घेतलं नाही, मग…- फारूक अब्दुला
“राज्यातील सहा हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये कमळ फुलणार”
नविन पॉलिसी मान्य नसेल, तर व्हॉट्सअॅप डिलीट करा- दिल्ली उच्च न्यायालय
आरोपांनंतरही धनंजय मुंडेंचा परळीत विजयी षटकार