महाराष्ट्र मुंबई

अजितदादांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी ‘ती’ भााषा शिकणार- उद्धव ठाकरे

Photo Credit- Twitter/@MahaDGIPR

जुन्नर | शिवाजी महाराजांना अनेक भाषा येत होत्या. त्यातली एक भाषा अजितदादांनाही येते. आता मला ती भाषा शिकायची आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवनेरीवर येऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

शिवाजी महाराजांना अनेक भाषा यायच्या. त्यातली एक भाषा मला माझ्या सहकाऱ्यानं सांगितली. अजितदादांना ती भाषा येते. आता मला ती भाषा शिकायची आहे. दादांच्या मनात काय चाललं ते कळलं पाहिजे म्हणून मी ती भाषा शिकणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केलं. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका, अस उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

शिवरायांपुढे नतमस्तक व्हायला शिवजंयतीच पाहिजे असं नाही. कोणतंही पवित्र काम करताना शिवाजी महाराज आठवतात. कारण शिवाजी महाराज आपल्या धमण्यात आणि रक्तात आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

आघाडी सरकारमधील या मंत्र्याला दुसऱ्यांदा कोरोना; 4 मंत्री पाॅझिटिव्ह आढळल्याने खळबळ

“विरोधकांचा कोथळा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं, महाराष्ट्रातही तसंच होईल”

शिवजयंतीवर बंधनं घालायला ही काय मोगलाई आहे काय?- देवेंद्र फडणवीस

सनरुफ उघडून नाचत होती नवरी, तेवढ्यात घडला काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, पाहा व्हिडीओ

पूजा राठोडचा गर्भपात झाला तेथील विभाग-प्रमुख होते रजेवर, गूढ आणखी वाढलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या