कोरोना पूर्णपणे गेलेला नाही तो पुन्हा वाढतोय, मास्क घालत रहा- उद्धव ठाकरे
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे.: कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावं, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
आता एक रुग्ण व्हेटिलेटरवर असून 18 रुग्ण ऑक्सिजनवर आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी असली तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही हे लक्षात घेऊन सर्वांनी सावधगिरी बाळगणं आणि त्यासाठी मास्क घालत राहणं, लस घेणं आवश्यक आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हिटी 1.59 टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटीव्हिटी आढळते.
मुंबईत रुग्णसंख्येत 52.79 टक्के वाढ झाली असून ठाण्यामध्ये 27.92 टक्के तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात 18.52 टक्के 68.75 टक्के इतकी वाढ झाली आहे.
थोडक्यात बातम्या-
Monsoon Update | मान्सून संदर्भात मोठी अपडेट समोर
“राक्षसी वृत्तीचं मुंडकं छाटल्याशिवाय मसनातील महाकाली शांत होणार नाही”
अनिल परबांवरील कारवाईनंतर अजित पवारांचा खळबळजनक आरोप, म्हणाले…
“अनिल परब यांनी आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी”
मोठी बातमी! परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड
Comments are closed.