बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जा, उगाच टीव्ही समोर जाऊन नाटकं करू नका- उद्धव ठाकरे

मुंबई | उगाच टीव्ही समोर जाऊन रडण्याचं ढोंग करू नका. तुम्हाला ज्या ज्यावेळी जे काही मिळालं ते आनंदाने उपभोगलच ना? मग आता कशाला रडताय? असा टोलाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माजी मंत्री रामदास कदम यांना नाव न घेता लगावला

पाहिलं तर आमदार आणि खासदारांना मी सुद्धा डांबून ठेवू शकलो असतो. त्याला लोकशाही म्हणत नाही. तुम्ही मनाने गेले असाल तर मी किती दिवस तुम्हाला कोंडू शकतो. त्या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये, असं ते म्हणालेत.

शिवसेनेच्या विरोधात कारवाया करायच्या त्याही तुम्ही केल्या. आता रडण्याचे ढोंगसोंग करू नका. शिवसैनिक तुम्हाला पुरतं ओळखून आहेत. ज्यांना जायचं त्यांनी जरूर जा. नाटकं करू नका. उगाचच टीव्ही समोर जाऊन रडण्याचं ढोंग करू नका. तुम्हाला ज्यावेळेला जे जे मिळालं ते ते तुम्ही आनंदाने भोगलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवार यांनी शेवटी डाव साधला. उद्धव ठाकरे हे भोळे आहे. शरद पवारांचा डाव उद्धव ठाकरेंना कळला नाही. आमचा पक्ष हा शरद पवारांनी फोडला आहे. शरद पवार यांनी शिवसेनेचे लोक फोडले. हे सातत्याने होत आहे. प्रत्येक आमदार उद्धव ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याच शरद पवार यांच्यावरील प्रेम कमी होत नाही, असं रामदास कदम म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

‘पीठ से निकले.. खंजरों को गिना जब…’; संजय राऊतांचं नवं ट्विट चर्चेत

“उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना भेटले, म्हणाले मलाही युती करायचीये”

“सत्तेच्या नशेत धुंद झालेले बंडखोर महापुरुषांच्या प्रतिमा ढकलून देत आहेत”

‘त्या’ भेटीचा उल्लेख करत खासदार राहुल शेवाळेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

‘…म्हणूनच हे बारा खासदार माझ्याकडे आलेत’; एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More