रामानंतर आता विठ्ठलाचा धावा; उद्धव चंद्रभागेच्या तीरी करणार आरती!

मुंबई |अयोध्येनंतर आता शिवसेना पंढरपुरात जाऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येतील शरयूप्रमाणेच चंद्रभागेच्या तिरावर आरती करणार आहेत.

पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेऊन सरकारने दुष्काळाबाबत विविध उपाययोजना करावी तसेच अयोध्येत राम मंदिर बांधण्याची सुबुद्धी सरकारला यावी यासाठी उद्धव ठाकरे विठ्ठलाकडे साकडे घालणार आहेत.

दुष्काळ प्रश्नाविषयी सरकारला जागे करण्यासाठी 24 डिसेंवर रोजी  सभा घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच येथूनच निवडणुकांचे रणशिंग फुकणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

दरम्यान, यावेळी मुंबई ते पंढरपुर दरम्यान धावणाऱ्या ‘विठाई’ या नव्या एसटी सेवेचा शुभारंभ उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

-भाजप-शिवसेना युती होणारच-रावसाहेब दानवे

“‘हर हर मोदी, घर घर मोदी’ नारा देणाऱ्या मोदी सरकारला शेवटची घरघर”

-लोकसभेला काय करायचं ते आम्ही ठरवू; उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक

-स्वतःला वाचवण्यासाठी मोदींनी सर्वोच्च न्यायालयाला फसवले- काँग्रेस

-शिवसेना-भाजप एकत्र आले तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकेल!