बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचं जगाला भावनिक आवाहन, म्हणाले…

कीव | रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन आता दोन आठवड्यांपेक्षाही जास्त कालावधी उलटला आहे. मात्र, रशियाकडून दिवसेंदिवस हल्ले तीव्र केले जात आहेत. रशियाकडून (Russia) होणारे बॉम्ब हल्ले, मिसाईल हल्ले, गोळीबार यामुळे युक्रेनमधील (Ukraine) अनेक शहरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

रशियाकडून हल्ले तीव्र होत असताना युक्रेनमधील सैनिकांसह शेकडो नागरिकांनी देखील जीव गमावला आहे. युक्रेनमधील परिस्थिती भयावह असताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी जगभरातील तमाम देशांना भावनिक आवाहन केलं आहे.

युक्रेनमधील मुलांच्या हत्येला कारणीभूत असलेल्या रशियासोबत सर्व व्यापार थांबवले पाहिजेत, असे आवाहन झेलेन्स्की यांनी केले आहे. जगभरातील युक्रेनीयन, राजकारण्यांशी संपर्क साधा, पत्रकारांशी बोला. रशियन बाजार सोडण्यासाठी व्यवसायांवर दबाव आणा. म्हणजे रशियात उद्योग करून मिळणारे डॉलर आणि युरो युक्रेनमधील रक्तपातासाठी दिले जाणार नाहीत, असंही झेलेन्स्की म्हणाले.

दरम्यान, युक्रेन विरोधातील या युद्धाची किंमत रशियासाठी अत्यंत वेदनादायी असेल, असा इशारा देखील झेलेन्स्की यांनी दिला आहे. जगातील प्रत्येकाने नैतिक भूमिका घेतली पाहिजे. फक्त जगभरातील देशांनीच नाही तर कंपन्यांनीह देखील ही भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहन देखील झेलन्स्की यांनी केले आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

सकाळचा चहा ठरू शकतो घातक, वाचा ‘हे’ गंभीर परिणाम

IPL खेळाडूंसाठी आणलेल्या बसेस मनसेने फोडल्या, वाचा काय आहे प्रकरण?

तळीरामांसाठी आनंदाची बातमी! सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान नाटोने दिलेल्या गंभीर इशाऱ्याने जगाचं टेन्शन वाढलं

“माझ्यासारख्या कलाकारांना…”, अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने सांगितले मराठी इंडस्ट्रीतले धक्कादायक अनुभव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More