बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील घडामोडींवर घटनाकार उल्हास बापट यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | सुरत, गुवाहाटी, दिल्ली आणि मुंबई येथे सुरु असलेले नाराजीनाट्य, सत्तानाट्य केव्हा थांबणार याची वाट महाराष्ट्र पहात आहे. यावर वेळोवेळी मंत्री एकनाथ शिंदे, आमदार बच्चु कडू, खासदार संजय राऊत आणि इतर नेते आपली मते व्यक्त करत आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि अपक्ष मिळून एकूण 40 बंडखोर आमदारांचा गट शिंदे यांच्यासोबत आहेत.

संपुर्ण शिवसेना फुटली असून सेनेत मोठी अराजकता माजली आहे. त्यातच शिंदेंचा गट प्रबळ झाला असून, राज्य सरकारला धोका निर्माण झाला आहे. शिंदे भाजपसोबत जाऊन राज्यपालांना भेटून सरकार पाडण्याची तयारी करत आहेत का?, अशा वेळी कायदा काय सांगतो, हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

घटनाकार उल्हास बापट यांच्या मते, एकनाथ शिंदे यांच्याकडे सेनेचे एकूण 37 आमदार आहेत. शिवसेनेच्या एकूण संख्याबळापैकी दोन तृतीअंश आमदार शिंदे गटात आहेत. जर त्यांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापनेच्या मार्गाचा अवलंब केला तर मविआ सरकार पडू शकतं. याच पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या सर्व नेत्यांना मुंबईला बोलावलं आहे.

जर शिंदे फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं तर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल. त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तर, सर्व अधिकार राज्यपालांकडे असतील. यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते आणि राज्यात सहा महिन्यांच्या आत निवडणूका देखील घ्याव्या लागतील.

थोडक्यात बातम्या- 

‘महाविकास आघाडीचं फार काळ टिकणारच नव्हतं’, उदयनराजे स्पष्टच बोलले

“जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल, सत्ता पुन्हा मिळवता येते, पण…”

आदित्य ठाकरेंनी उचललं मोठं पाऊल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण, नाना पटोलेंनी दिली माहिती

“आमची नेतृत्वावर नव्हे तर राष्ट्रवादी-काँग्रेसवर नाराजी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More