बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संतापजनक! भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने महिलेला शेतात नेत केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

अहमदनगर | माणूस 21 व्या शतकात आला इतकी प्रगती केली मात्र अजुनही काही लोक अंधश्रद्धेमुळे आपली फसवणुक करून घेताना दिसत आहे. अंधश्रद्धेचा फायदा देत काही समाजकंटक भोंदूबाबा बनत समाजातील लोकांची फसवणूक करून त्यांना लुटतात. अशाच प्रकारे एका भोंदूूबाबाने भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने एका महिलेवर अत्याचार केले आहेत. सावित्रा गडाख असं अटक केलेल्या मांत्रिकाचं नाव आहे.

संगमनेर तालुक्यामध्ये पारेगाव बुद्रुक गावातील एका महिलेला गेल्या अनेक दिवसांपासून काही त्रास होत होता. डॉक्टरांकडून योग्य उपचार घेण्याऐवजी अंधश्रद्धेला बळी पडत ती एका भोंदूबाबाकडे गेली. त्याने त्या महिलेला सांगितलं की  तुझ्यावर भूतबाधा झाली आहे. तुझ्या अंगातले भूत उतरावं लागेल असं महिलेला सांगितलं. महिलेने बाबावर विश्वास ठेवला.

महिला आपल्या पतीला घेऊन मांत्रिकाकडे गेली. यावेळी या मांत्रिकाने महिलेला दारू पाजली आणि तिला शेतात नेलं. मांत्रिकाने महिलेला बळजबरीने दारू पाजली आणि शेतात तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारानंतर महिलेने पोलिसांकडे जाऊन सर्व काही सांगितलं. त्यानंतर तिने मांत्रिकाविरोधात संगमनेर पोलिसात तक्रार दाखल केली.

दरम्यान, महिलेच्या तक्रारीनंतर मांत्रिकावर पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधत कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आणि या मांत्रिकाला अटक केली असल्याची माहिती आहे. याबाबत न्यूज18लोकमतने वृत्त दिलं आहे. नागरिकांनीही समाजातील अशा भोंदूबाबांपासून सावध रहायला हवं.

थोडक्यात बातम्या- 

“कोरोनावर आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी मला जामीन देण्यात यावा”

‘देवेंद्र फडणवीसांनी बनवलेला तो कायदा जर फुलप्रूफ असता तर…’; उद्धव ठाकरेंचा पलटवार

मराठा आरक्षणासाठी सरकारच्या हालचाली! राज्यपालांना निवेदन, लवकरच पंतप्रधानांना भेटणार- मुख्यमंत्री

झोपेत असताना काळाचा घाला! झोपेतच नवरा-बायकोचा होरपळून दुर्दैवी मृृत्यु

…तेव्हा आमचाही जीव तुटतच असेल ना!; डॅाक्टरच्या पत्नीचं काळजाला हात घालणारं पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More