नवी दिल्ली | आपल्या देशातील कोरोनाची स्थिती ही अजुन गंभीरच असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय. 8 राज्यांमध्ये आर फॅक्टरचा जोर कायम असुन महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये याचा धोका कमी झाला असल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल म्हणाले. देशातील एकूण 44 जिल्ह्यांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी रेट कायम आहे. तर 57 जिल्ह्यांमध्ये दररोज 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. दुसऱ्या लाटेला गंभीरतेने घेण्याचा इशारा लव अग्रवाल यांनी दिलाय.
आपल्या देशातील सक्रीय रूग्णसंख्या जरी घटत असली तरी निर्बंध उठवले तर नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. सध्या आपण आर फॅक्टरच्या मदतीने रुग्ण संख्या किती हे पाहत आहोत. आर फॅक्टर( रिप्रोडक्शन नंबर) च्या माध्यमातुन आपण सक्रिय रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात असणाऱ्या रूग्णांचा अंदाज बांधतो.
अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि भारतात आर फॅक्टर रेट 1:2 असा आहे. म्हणजेच एका व्यक्तिपासून दुसऱ्या किंवा अधीक लोकांना तो होऊ शकतो. तीसऱ्या लाटेसंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले ‘आधी दुसऱ्या लाटेचा आपण गांभीर्याने विचार करून तीला संपवायला हवं’
दरम्यान, कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मिर, मिझोरम, तामिळनाडु, पुद्दुचेरी, या आठ राज्यांमध्ये आर फॅक्टरचा प्रभाव जास्त आहे, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली आहे.
‘माझ्या अंगावरून गाडी घाला’; पुण्यात भररस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा
“खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार”
पुण्याला झिका व्हायरसचा धोका?; केंद्रीय पथक तातडीने पुण्यात दाखल
पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ विचित्र अपघात, ट्रकची 6 वाहनांना धडक!
भाजपच्या ‘या’ माजी आमदाराला मोठा धक्का! पत्नीच्या शैक्षणिक संस्थेला कोट्यवधींचा दंड
Comments are closed.