केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना आईची आठवण आल्याने केली भावनिक कविता शेअर!
मुंबई | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना त्यांच्या आईची आठवण आल्याने भावूक होऊन त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक कविता शेअर केली आहे. आठवले यांच्या कविता या नेहमीच मिश्कील आणि मजेशीर असतात. संसदेत कित्येक वेळा आठवले यांच्या कवितांनी नरेंद्र मोदींसह इतर बड्या नेत्यांना आपल्या हसू आवरता आलं नाही.
आईची आठवण आल्याने आपल्यापैकी बरेच जण भावनिक होतात. अशीच आठवण केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनाही आल्याने त्यांनी कविता करून आपल्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत.
माझी सुद्धा होती आई,
नाव तिचं होतं हौसाबाई,
पण तिने जाण्याची केली घाई,
आईची आठवण येते ठाई ठाई!
अशा भावनिक शब्दांमध्ये केलेल्या ट्विटनंतर अनेकांनी आठवले यांच्या ट्विटला लाईक केलं तसेच शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी हे ट्विट आपल्या अकाउंटवर रिट्विटही केलं आहे. आठवले आपल्या कवितेमुळे नेहमीच चर्चेत असतात. परंतु आताच्या त्यांच्या आईच्या कवितेवरून त्यांची कवितेची दुसरीही एक बाजू जगासमोर आली आहे.
माझी सुद्धा होती आई
नाव तिचं होतं हौसाबाई
पण तिने जाण्याची केली घाई
आईची आठवण येते ठाई ठाई— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) March 16, 2021
थोडक्यात बातम्या –
बटलरची खेळी विराटवर भारी; दणदणीत विजयासह इंग्लंड मालिकेत आघाडीवर
‘या’ महापालिका हद्दीतील शिक्षकांना घरून काम करण्याचे आदेश!
महाराष्ट्रासाठी आरोग्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे ‘इतक्या’ कोटी लसींची मागणी!
जाणून घ्या…महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी
पुणे विभागीय आयुक्तांना कोरोनाची लागण; नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन!
Comments are closed.