बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् उर्फीने कपड्यांऐवजी चक्क गुंडाळल्या तारा, पाहा व्हिडीओ

मुंबई | बिग ओटीटीमुळे प्रसिद्धिस आलेली अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या कपड्यांमुळे काहीजण तिला ट्रोलही करत असतात. आता पुन्हा एकदा तिने घातलेल्या कपड्यांमुळे ती चर्चेत आली आहे. तिने सोशल मिडीयावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने शरिरावर तार गुंडाळ्याने अनेकजण तिला ट्रोल करत आहेत.

या व्हिडिओतील कपड्यांमुळे तिची तुलना रणवीर सिंगच्या(Ranveer Singh) न्यूड फोटाशी केली आहे. याशिवाय तिला अनेक कमेंट्स करत नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. आता तिने या सगळ्याला कंटाळून तिने अशी तार का गुंडाळली आहे, याचा खुलासा केला आहे.

उर्फी जावेद स्पष्टीकरण देताना म्हणाली, या व्हिडिओमागे एक कारण आहे, कशाप्रकारे भारतीय महिलांना सुंदर दिसण्यासाठी मोठे दागिने आणि फुलांनी सजविले जाते, पण त्यामुळे तीला नीट चालता देखील येत नाही. तिला तिचे पंख पसरविता येत नाहीत. हे जरी आमच्या जनरेशनमध्ये जास्त होत नसले तरी ते जुन्या जनरेशनमध्ये असलेल्या महिलांसाठी आहे.

दरम्यान, उर्फी जावेद इंस्टाग्रामवर(Instagram) नेहमी सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर 3 मिलीयनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिने ये रिश्ता क्या केहलाता है, बडे भैय्या की दुल्हनिया, कसोटी जिंदगी की अशा अनेक सुपरहिट मालिकांमध्ये काम केले आहे. एका शोमध्ये रणवीर सिंग उर्फी जावेदला ‘फॅशन आयकाॅन’ म्हणाला होता.

पाहा व्हिडिओ-

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुणे दौऱ्यावर पुणेकरांची नाराजी

उदय सामंतांवरील हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे आक्रमक, म्हणाले…

प्रणिती शिंदेंची मोदी सरकारवर सडकून टीका, म्हणाल्या…

“गद्दारांची गाडी फोडणार त्याचा शिवसेना प्रमुखांच्या हस्ते सत्कार करणार”

संजय राऊतांची एकूण संपत्ती किती?, स्वत:च केला होता खुलासा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More