Top News

सोनिया गांधी आणि राहुल गांधींविषयी आदर, पण….- उर्मिला मातोंडकर

मुंबई | माझे काही मतभेद झाल्यामुळे मी काँग्रेस पक्ष सोडला. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत आजही आदर आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याबद्दलही माझ्या मनात अतिशय आदर आहे. त्यामुळे कोणता पक्ष सरस असा विचार करणं चुकीचं आहे, असं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं आहे. त्या  दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

सरकारने कोरोना संकटात केलेलं काम वाखणण्याजोगं आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना ओला दुष्काळ, चक्रीवादळ बघावा लागला. या सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेत सर्व प्रकारच्या लोकांना बरोबर घेऊन शिवसेना पुढे चालली आहे, असं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं.

आपण जेव्हा एखाद्या पक्षात प्रवेश करतो तेव्हा त्या पक्षासोबत आपली वैचारिक बांधिलकी असावी लागते. कार्यप्रणाली आवडायला हवी. ते जेव्हा आपल्याला वाटते तेव्हाच आपण पक्षात प्रवेश करतो. त्यामुळे मी आज शिवसेनेत प्रवेश केला, असंही उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“आठ महिने मंत्रालयात पाऊल न टाकणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने इतिहासात पाहिला नाही”

मंदिरातील पुजारी अर्धनग्न, मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का?- तृप्ती देसाई

ईडीने नारायण राणे यांच्या संपत्तीची चौकशी करावी; शिवसेना खासदाराची मागणी

अभिजीत बिचुकले यांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली नाही; जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा

“मुख्यमंत्री असताना आरक्षण देता आलं असतं, पण शरद पवारांनी दुर्लक्ष केलं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या