महाराष्ट्र मुंबई

राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार- वर्षा गायकवाड

मुंबई | शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. तर 11वी प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बैठक घेणार आहे. त्या बैठकीत विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. अशा पालकांना टप्प्या-टप्प्यात फी भरण्याची मुभाही देण्यात आल्याचं गायकवाड यांनी सांगितलंय.

जर विद्यार्थी फी भरु शकला नाही तर शाळा अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही. एखाद्या शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास, अशा शाळांवर कारवाई करण्याचा इशाराही शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिला आहे.

9 वी ते 12 वीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करण्याबाबत विचार केला जाईल, असं गायकवाड यांनी सांगितलंय.

महत्वाच्या  बातम्या-

“एक वेळ अशी येईल की मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील”

“शरद पवारांकडे ‘हर मर्ज की दवा’, म्हणून राज्यपालांनी राज ठाकरेंना पवारांना भेटण्याचा सल्ला दिला”

जो बायडन यांनी फ्लोरिडामध्ये मुसळधार पावसात घेतली सभा

“प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवायचं असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा”

विराटविषयी सूर्यकुमार यादवने केलेलं 4 वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट व्हायरल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या