बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आंगावर काटा आणणारा व्हिडीओ, हात निसटला अन् ती थेट 9व्या मजल्यावरुन खाली कोसळली

गाझियाबाद | गाझियाबाद येथे काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. यावेळी एक महिला चक्क 9 व्या मजल्यावकरुन खाली कोसळली आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. महिलेची परिस्थिती गंभीर अशून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

क्रॉसिंग रिपब्लिकच्या सेवियर सोसायटीमधील एका दाम्पत्याचं जोरदार भांडण झालं. हे दाम्पत्य सोसायटीमधील 9व्या मजल्यावर रहिवासी आहेत. यादरम्यान महिला बाल्कनीमध्ये गेली आणि उडी मारेल असं म्हणू लागली. अशातच दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि महिला घसरुन 9व्या मजल्यावर खाली पडली.

या थरारक घटना कॅमेरामध्ये कैद झाली असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पत्नी खाली कोसळत असताना पतीने पुढे येऊन तिचा हात धरला होता. मात्र तो काही काळ टिकला नाही आणि मोठी दुर्घटना घडली.

दरम्यान, पती-पत्नीमधील वादाची माहिती पोलीसांना मिळाली असून पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. तसेच महिलेची अवस्था गंभीर असल्याने तिच्यावर रुग्णलयात उपचार सुरु आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

‘…अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू’; खासदार संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

वाढदिवसाच्या दिवशीच माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन!

‘खासगी कामासाठी सरकारी विमानाने प्रवास का केला?’; न्यायालयाने उर्जामंत्र्यांकडे मागितलं उत्तर

“एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण नंबर वन यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच आहे”

पुण्यातच तयार होतेय ‘भारतातली पहिली mRNA’ कोरोना लस; वाचा संपुर्ण माहिती

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More