बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभी तो हम जवान है!; 80 वर्षाच्या दोन तरुणांच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई | कोरोनाने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं. तसेच त्यामुळे लागलेल्या लॉकडाऊनचा अनेकांच्या आयुष्यावर परिणाम झाला. या काळात अनेकांनी आपल्या जवळची माणसं देखील गमावली. तर अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. तसेच कोरानामुळे लोकांचं मानसिक नुकसान देखील झालं.

गेल्या वर्षभरात प्रचंड नकारात्मक वातावरण निर्माण झालं. मात्र याच काळात काही गोष्टी प्रेरणादायी, आनंद देणाऱ्या आणि एक प्रकारची सकारात्मक उर्जा देणाऱ्या देखील घडल्या. सध्या अशीच सकारात्मक उर्जा देणारा आणि मनसोक्त जगणं काय असतं हे दाखवून देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वयाची सत्तरी पार केलेल्या दोन आजोबांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही आजोबा मनसोक्त नाचताना दिसत आहे. गावातील रस्त्यात दोघे जण पिपाणी आणि संबळ वाजवताना दिसत आहेत. यावर भररस्त्यात दोन्ही आजोबांनी ठेका धरल्याचं दिसत आहे. तसेच काही बायका आजोबांची ओवाळणी करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

हातात काठी घेऊन नाचणाऱ्या या आजोबांचा उत्साह तरूणांनाही लाजवेल असा आहे. तसेच हा व्हिडिओ पाहून तुमच्या तोंडून अरे वाह आणि चेहऱ्या हसू उमटल्याशिवाय राहणार नाही.

पाहा व्हिडिओ-

 

थोडक्यात बातम्या-

नवऱ्याकडून अमानुष मारहाण; मदत मागण्यासाठी गेलेल्या गर्भवती पीडितेला पोलिसांनी हाकललं!

अभिमानास्पद! सहाच्या सहा बहिणी पोलिस दलात; अनिल देशमुखांनीही केलं कौतुक

वाढदिवसाला मैद्याच्या केकऐवजी फळांचा केक कापा; सोशल मीडियावर मागणीनं धरला जोर

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुरलीधर मोहोळ यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

चिंताजनक! ‘कोरोना’ लसीचे डोस घेऊनही जिल्हाधिकारी आढळले ‘कोरोना पॉझिटिव्ह’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More