अहमदनगर | पुणे असं आहे की इथं प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. पण देवेंद्र मी तुम्हाला सांगतो, मी कोल्हापूरला परत जाणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पाटलांवर निशाणा साधला आहे.
चंद्रकात पाटील म्हणजे चंपारण्यातील पात्र असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. अहमदनगरमध्ये ते माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
पाटील चंपारण्यातील एक पात्र असून . हे पात्र नेहमी भ्रमण करतं त्यांच्या सोयीच्या ठिकाणी ते थांबत आणि गैरसोय झाली की हे पात्र बदलतं. या पात्रामध्ये चंद्रकांत पाटील असावेत, असं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. पाटलांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निशाणा साधला आहे.
दरम्यान, सुरुवातीला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलावलंही नव्हतं, असं अजित पवार म्हणाले होते.
थोडक्यात बातम्या-
काँग्रेसची मोठी घोषणा; ही निवडणूक स्वतंत्र लढणार
‘महाराष्ट्राच्या ‘वाघा’ला घरच्यांनीच मरतुकडा म्हणणं म्हणजे…’; भाजपची जहरी टीका
सरकारनं तो निर्णय मागं घ्यावा’; अबू आझमींचं उद्धव ठाकरेंना पत्र
मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी!
लठ्ठ व्यक्तींनो वेळीच सावध व्हा; संशोधनातून समोर आला मोठा धोका!