बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केबल कनेक्शन देण्याइतकं परबांना एसटीचं काम सोप्प वाटतं का?”

अहमदनगर | महाराष्ट्रात गेल्या 12 दिवसांपासून एसटी कामगारांचा संप सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच या संपावरून राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी या प्रकरणात लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी सध्या सर्वच स्तरातून करण्यात येत आहे. त्यातच भाजपने या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या मुद्द्यावरून परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. केबल कनेक्शन देण्याइतकं परबांना एसटीचं काम सोपं वाटलं का?, असा खोचक सवालही त्यांनी यावेळी विचारला आहे. तसेच सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्याचं मी समर्थन करतो, असंही विखे पाटील म्हणाले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांच्या कुटूंबियांचा आक्रोश हे पाहिल्यावर मंत्र्यांच्या आरत्या ओवाळायच्या का?, तसेच अनिल परबांनी कधी एसटीने प्रवास केलाय का?, असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांवरही यावेळी निशाणा साधला.

बाळासाहेब ठाकरे आज जर असते तर त्यांनी कामगारांची बाजू घेतली असती, असं म्हणत सध्याचे राज्यातील ज्येष्ठ नेते यांना अनिल देशमुखांची पाठराखण करायला वेळ आहे पण एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांचं नाव न घेता यावेळी बोलत असताना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या

“वाह रे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल”

मुंबईतील कोरोना आला आटोक्यात, वाचा आजची आकडेवारी

पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात

‘या’ बड्या शिवसेना नेत्यासह विश्वास नांगरे पाटीलही किरीट सोमय्यांच्या रडारवर

अमरावती हिंसाचार घटनेवरून महिला व बालविकास मंत्र्यांनी फडणवीसांना दिला ‘हा’ सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More