बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नारायण राणेंसारख्या गद्दाराची डाळ शिजू देणार नाही”

सिंधुदुर्ग | शिवसेना नेते विनायक राऊत यांनी नारायण राणेंना चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं आहे. कुडाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. आजच नाही तर भविष्यात कधी राणे अंगावर आलं तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.

नारायण राणेंसाख्या गद्दाराची डाळ सिंधुदुर्गमध्ये शिजू देणार नाही, अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली आहे. हिंमत असेल तर नारायण राणे यांनी पुन्हा एकदा वैभव नाईक यांच्याविरोधात उभं राहून दाखवावं. पराभाव झाल्याशिवाय राहणार नाही, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

नारायण राणेंनी हिमंत असेल तर कुडाळ मालवणमधून निवडणुक लढवून दाखवावी. त्यांचे डिपोजीट जप्त नाही केले तर शिवसेनेचे नाव सांगणार नाहीत. दोनदा नारायण राणेंच्या मुलाचा पराभव झाला आहे. एकदा त्यांचा झाला आहे, अशा खोचक शब्दात विनायक राऊतांनी राणेंवर टीका केली आहे.

सिधुदुर्गात नारायण राणेंसारख्या गद्दाराची डाळ कधीच शिजणार नाही. हे जिल्ह्याने दाखवून दिलं आहे, असा घणाघातही संजय राऊतांनी केला आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंतदेखील उपस्थित होते. सामंत यांनीही भाजपवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्राची जनता नक्कीच भाजपला त्यांची जागा दाखवेल, असं सामंंत यावेळी म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘या’ शिवसेना नेत्याच्या घरी सुरू होतं सेक्स रॅकेट; पोलिसांकडून पर्दाफाश

मोठी बातमी! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट

‘मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते’; नवाब मलिक यांचं सूचक ट्विट

देवेंद्र फडणवीसांनी फोडला बॉम्ब; नवाब मलिकांवर केलेल्या आरोपांनी खळबळ

“लोकांनी निवडून दिलं तर यांनी देशच विकायला काढला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More