मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांचे मुंबई बाहेर स्टँड-अप कॉमेडी शो सुरू आहेत, अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवाराला निवडूण द्या असं राज ठाकरे म्हणतात. आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी करणार आहोत की त्यांच्या सभांचा खर्च त्या ठिकाणच्या काँग्रेस राष्ट्रवादी उमेदवाराच्या खर्चात टाकावा आणि त्या खर्चाचं काय करावं ते निवडणूक आयोगाने सांगाव, असं विनोद तावडें म्हणाले.
मोदी-शहा यांना संपवू असं राज म्हणतात पण मनसेचा साधा एक आमदार, खासदारही नाही, असा टोला विनोद तावडेंनी लगावला आहे.
दरम्यान, शुक्रवार कालपासून राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दोऱ्याला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात 8 ते 10 सभा घेऊन मोदी-शहांच्याविरूद्ध ते रान पेटवणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
-“राज ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपला भीती वाटतेय”
शरद पवारांना लाज, लज्जा शरम काही राहिली नाही- उद्धव ठाकरे
बाळा राहुल, हे हिंदुस्तान आहे, इथे नामर्दाला जागा नाही- उद्धव ठाकरे
तुझ्या (..) दम नसेल तर मला सांग…- नरेंद्र पाटील
प्रकाश आंबेडकरांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही- भालचंद्र मुगणेकर
Comments are closed.