झहीर आणि सागरिकाच्या रिसेप्शनला विरानुष्काचे ठुमके

मुंबई | भारताचा माजी गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे नुकतेच विवाहबद्ध झालेत. त्यानिमित्ताने त्यांच्याकडून रिसेप्शनही देण्यात आलं. रिसेप्शमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा डान्स चांगलाच गाजला.

रिसेप्शनला बॉलीवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सगळे सेलिब्रिटींची पावलं गाण्यांवर थिरकले. त्यामध्ये विराट आणि अनुष्काच्या डान्सच्या ठुमक्यांनी उपस्थितांचं लक्ष्य वेधून घेतलं.