Top News आरोग्य

Doctor’s day- कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या डॉक्टर योद्ध्यांना विराट-रोहितचा सलाम

मुंबई | सध्या जगभरात पसरलेल्या कोरोनाचा डॉक्टर मोठ्या ध्यैर्याने सामना करतायत. डॉक्टर्स डेच्या निमित्ताने प्रत्येकजण डॉक्टरांच्या या प्रयत्नांचं स्वागत करतोय. भारतातील डॉक्टर कोरोनाच्या संकटाविरुद्ध ज्या जिद्दीने, ज्या भावनेने लढतायत त्याचं भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा यांनीही डॉक्टर्स डेच्या निमित्ताने कौतुक केलंय.

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली याने ट्विटरवरून डॉक्टरांना सलाम केलाय. “फक्त आजच नाही तर दररोज आपण डॉक्टरांचा आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा दिवस साजरा केला पाहिजे. लोकांना मदत करण्याच्या सेवेबद्दल सर्व डॉक्टरांचे आभार. मी तुमच्या कार्याला आणि समर्पणाला सलाम करतो. #National Doctor’s Day” अशा आशयाचं कोहलीने ट्विट केलंय.

तर उपकर्णधार रोहीत शर्मा लिहीतो, “सध्याच्या कठीण काळात आपल्या डॉक्टरांनी केलेला त्याग आणि धैर्य सर्वांना माहिती आहे. त्यांचे प्रयत्न शब्दात मांडणं शक्य नाही. मी डॉक्टरांना शुभेच्छा देतो. सर्व नागरिकांनी त्यांच्या प्रोटोकॉलचं पालन करावं आणि त्यांचे कार्य सुलभ करावं. #National Doctor’s Day”

कोरोनाच्या या महामारीमध्ये अविरत झटणारे डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना सर्व स्तरातून #National Doctor’s Day च्या शुभेच्छा देण्यात येतायत.

ट्रेंडिंग बातम्या-

अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली अन्…..”

महत्वाच्या बातम्या-

“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”

हिंदुस्थानी भाऊला आयएसआय या दहशतवादी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी!

फेसबुककरांनो! पासवर्ड बदलला नाही तर……

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या