बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अर्धशतक पूर्ण करून विराटनं अनोख्या अंदाजानं जिंकली चाहत्यांची मनं; पाहा व्हिडीओ

मुंबई | भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी सध्या त्यांच्या रोमान्समुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराटनं पत्नी अनुष्कासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर या दोघांचा आणखी एक रोमँटिक फोटोही समोर आला आहे. विराट कोहली सध्या आयपीएल 2021 मध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील तिच्या नवऱ्याला प्रोत्साहित करताना दिसत आहे.

काल संध्याकाळी विराटचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जोरदार झुंज झाली. या सामन्यात कोहलीचा संघ विजयी झाला आणि विराट कोहलीने 72 धावांची नाबाद खेळी साकारली. त्यावेळी त्यानं आपलं अर्धशतक पूर्ण करून आपल्या मुलीला म्हणजेच ‘वामिका’ला समर्पित केलं. तर, पत्नी अनुष्का शर्माला त्याने फ्लाईंग किस दिल्याचं दिसत आहे. हा क्षण व्हिडीओत कैद केला असून आता सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.

या व्हिडीओमध्ये कोहली बॅट उंचावताना दिसून येत आहे. त्याचे सहखेळाडू त्याच्यासाठी टाळ्या वाजवत आहे. तर अनुष्काकडे पाहत असताना कोहली हसतो आणि फ्लाईंग कीस देतो. त्यानंतर वामिकाला आपल्या कुशीत घेतल्याचं हावभाव करतो. विराट कोहलीच्या या अनोख्या अंदाजानं त्याचे चाहते खूप खुश झाले आहेत.

दरम्यान, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 2017 मध्ये इटलीत लग्न केलं होतं. या दोघांची मुलगी  वामिकाचा जन्म 11 जानेवारी 2021 रोजी झाला होता. कोहली आणि अनुष्का सध्या मीडियाच्या नजरेतून आपल्या मुलीला लांब ठेवत असल्याचं दिसत आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by IPL (@iplt20)

 

थोडक्यात बातम्या

“पवारसाहेब, तुम्ही काही करु नका, तुमचे कारखाने हवेतला ऑक्सिजनही सोडणार नाहीत”

सोशल मीडियावरही रुजतेय वाचनसंस्कृती, ‘वाचनवेडा’ फेसबुक ग्रुप करतोय कमाल!

“साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी”; शरद पवारांचं सर्व कारखान्यांना पत्र

आता आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी लागणार ई-पास; जाणून घ्या ई-पास कसा काढायचा?

“ज्या दिवशी उपमुख्यमंत्रिपद जाईल त्या दिवशी…”; निलेश राणेंचा अजित पवारांवर निशाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More