बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानविरूद्ध भारताला यश का मिळतं?, विरेंद्र सेहवाग म्हणतो…

मुंबई | टी-20 विश्वचषकामध्ये भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. टी-20 विश्वचषकामध्ये आणि एकदिवसीय विश्वचषकातील भारताची पाकिस्तान विरूद्ध कामगिरी चांगली आहे. विश्वचषकामध्ये भारताचा पाकिस्तानविरूद्ध कधीच पराभव झाला नाही. टी-20 विश्वचषकामध्ये भारतानं पाकिस्तानविरूद्ध सर्व 5 सामने जिंकले आहेत. भारताच्या या यशाचं गमक भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग याने सांगितलं आहे.

भारत पाकिस्तान सामन्याआधी आम्ही कधीच मोठी वक्तव्य करत नाही. पण पाकिस्तानकडून अशा प्रकारची मोठी मोठी वक्तव्य केली जातात. आम्ही आपली चांगली तयारी करतो. जेव्हा तुम्ही चांगली तयारी करता. तेव्हा निकाल काय असू शकतो, ते तुम्हाला आधीपासूनच माहिती असतं. तसेच 2003 आणि 2011 च्या विश्वचषकामध्ये आम्ही कमी दबावात होतो, भारतीय संघ दबावाची परिस्थिती चांगली सांभाळतो, असं विरेंद्र सेहवागनं भारताच्या यशाचं गुपित सांगताना म्हटलं आहे.

पाकिस्तानकडे भारताला हरवण्याची संधी आहे. क्रिकेटचं स्वरूप पाहिलं तर पाकिस्तानला भारताला हरवण्याची संधी जास्त मिळू शकते. कारण 50 ओव्हरच्या स्वरूपात पाकिस्तान चांगलं खेळत नाहीत. या छोट्या स्वरूपाच्या खेळात एक खेळाडूही दुसऱ्या संघाला हरवू शकतो, असं सेहवाग म्हणाला आहे.

दरम्यान, पाकिस्तानला भारताचा अद्याप पराभव करता आला नाही. तसेच येत्या 24 ऑक्टोबरला पाकिस्तान जिंकतो का हारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विरेंद्र सेहवाग हा एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता.

थोडक्यात बातम्या –

”त्या’ बिहारी लोकांना मोफत AK-47 द्या’; भाजप आमदाराची अजब मागणी

“शिवसेेनेचं हिंदूत्व किती ढोंगी आहे, हे पुन्हा सिद्ध झालंय”

“काँग्रेस-राष्ट्रवादीचं पाप मी निस्तरतोय, काळजी करू नका मी दिलेला शब्द पाळतो”

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! इमारती, रस्ते, पुल उद्धवस्त तर भूस्खलनामुळे 16 जणांचा मृत्यू

यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यात तू-तू-मै-मै, सभागृहाचं वातावरण तापलं; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More