पाकिस्तानला मोठा डोस पाजायला हवा- वीरेंद्र सेहवाग

वीरेंद्र सेहवाग

मुंबई | पाकिस्तानला छोटा डोस पाजून काम होत नसेल तर मोठा डोस पाजायला हवा, असं ट्विट भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं केलंय. पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरलीय. त्यापार्श्वभूमीवर त्याने आपला संताप व्यक्त केलाय.

जम्मू-काश्मीरच्या पुँछ जिल्ह्यातील मेंढरमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी जवानांनी सोमवारी केलेल्या तोफगोळ्यांच्या मा-यात २ भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर त्यांत्या मृतदेहांची विटंबना केल्याचा प्रकार समोर आलाय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या