मुंबई | आरे प्रकरणावरुन सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर टीका केली आहे. साहित्यिक, कलावंत, खेळाडू कधी बोलणार? त्यांना जगण्यासाठी ऑक्सीजन लागत नाही का?, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
आरे वृक्षतोडीला शुक्रवारी रात्री सुरुवात झाली. वृक्षतोडीच्या विरोधात मोठे आंदोलन उभे राहिले. मात्र, ज्येष्ठांच्या पिढीतले सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, कलावंत, खेळाडू यांच्याकडून विरोध होत नसल्याने चौधरी यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे.
ज्येष्ठांच्या पिढीतल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलणं सोडून दिलंय का? आरेच्या प्रश्नावर मेधाताई सोडून कोणी बोलणार आहे की नाही? दरवेळी अण्णांकडूनच अपेक्षा नाही. ज्यांना महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं असे मोठे सामाजिक कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात आहेत, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
साहित्यिक, कलावंत, खेळाडू कधी बोलणार? त्यांना जगण्यासाठी ऑक्सीजन लागत नाही? लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर कार्बन डायऑक्साईड वापरून श्वसन करतात का?, असा सवाल त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आरे वृक्षतोडप्रकरणी प्रकाश आंबेडकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात https://t.co/zy9R6CUJKS @Prksh_Ambedkar @VBAforIndia #AareyForest #AareyProtest
— थोडक्यात (@thodkyaat) October 6, 2019
“लकडी में जीव होता है, हम लकडी नहीं काट सकते!”; मोदींचा व्हीडिओ व्हायरल https://t.co/i2mqyaAmvJ @BJP4Maharashtra @narendramodi
— थोडक्यात (@thodkyaat) October 6, 2019
‘आरे’तील वृक्षतोडीवरून प्रकाश आंबेडकरांचे सरकारवर गंभीर आरोप; म्हणतात…- https://t.co/RqXvNOERJK #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 6, 2019
Comments are closed.